<
अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक सुपरिचित व उमद नेतृत्व म्हणून प्रकाश पाटील यांचे नावलौकिक आहे. ग्रामीण भागात सबगव्हान सारख्या दुर्लक्षित खेड्यात शेतकरी कुटुंबात श्री. पाटील यांच्या जन्म झाला.
वडील उत्तम शेतकरी होते. प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना वडिलांसोबत शेती मध्ये ही खूप मेहनत श्री. पाटील घेत असत. शिक्षण पूर्ण करून मंगरूळ येथील माध्यमिक शाळेत उपशिक्षक म्हणून सेवा आरंभ करीत सुरवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना करत श्री. पाटील यांनी आपली प्रगतीची घोडदौड चालूच ठेवली.
नंतर प्रकाश पाटील हे मुख्याध्यापक झाले. शाळेच्या विकासासाठी सदैव अग्रेसर राहत विविध उपक्रमच्या माध्यमातून शाळेची प्रगती साधत तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था व शिक्षक, मित्र मंडळी सह जिव्हाळ्याचे संपर्क जोपासत असतात. तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड नुकतीच झाली आहे.
राज्य शैक्षणिक महामंडळ नाशिक बोर्ड येथेही श्री. पाटील हे बोर्ड सदस्य म्हणून निवड झालीय, जन्मभूमी व कर्मभूमी साठी आपले कर्तव्य सातत्याने करीत असतात. गावातील गोरगरिबांना आपल्या परीने विविध शालेय अडचणी सोडविण्यासाठी श्री. आपला अमूल्य वेळ देत असतात. आजवर गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी श्री. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. प्रकाश पाटील यांचा मुलगा स्पर्धा परीक्षा देऊन इंडियन नेव्हीत कोची येथे देशसेवा करीत आहे. अतिशय जिव्हाळ्याचे संबध जोपासत मितभाषी स्वभावामुळे ते लोकप्रिय ठरतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.