<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील विधी सेवा प्राधिकरण मार्फत जामनेर वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत पळसखेडा येथील ग्रामीण भागात कायद्याविषयी आणि विधी सेवा प्राधिकरण विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावेळी ॲड.शुक्ला यांनी ग्राहक सुरक्षा या विषयी ॲड.किरोते यांनी महिला व त्यांची सुरक्षा व अधिकार या विषयी तसेच पळसखेडा येथील समाजसेवक राजू खरे यांनी संविधान आणि आपले अधिकार या विषयी तर ॲड. आशितोष चंदेले यांनी विधी सेवा प्राधिकरण या विषयी मार्गदर्शन केले.
या साठी गावातील उपसरपंच संगीता शिंदे, ग्रामसेवक योगेश पालवे तसेच पी एक व्ही सदस्य रतनसिंग राजपूत, एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी संकेत राजपूत, विनोद सोनवणे, दीपक भोई, तेजस्विनी पाटील, दीक्षा गायकवाड, पूजा साखला, दीप्ती देठे, मिलिंद सपकाळे, वाहेदत शेख आणि ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.