<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील सुचित्रा युवराज महाजन या गेल्या 2005 पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. जन सामन्यांचा न्याय व हक्कांसाठी काम करत आहेत. जे संसार विभत्त होण्याच्या मार्गावर आहेत श्या संसारांना समुपदेशन करून त्यांना नवंसजीवनी देण्याचे काम करत आहे.
गावोगावी व्याख्याने देऊन समाजात बदल घडवनू आणण्याचे काम ही सौ. महाजन यांनी केले आहे. यांच्या व्याख्यानाचा अगदी आवडीचा विषय म्हणजे “आजची ढासळलेली कुटुंबव्यवस्था” या विषयातून संबंधांमधील कटुतेचे कारण व ते सुधारण्याचे उपाय या विषयावर समाज प्रबोधन करण्याचे काम सौ. महाजन करतात. त्या उपभोक्ता उत्थान सघंटनेच्या ही जिल्हाध्यक्ष आहेत. या अतंर्गत शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांना धडा शिकवण्याचे काम त्यांनी केले आहे. अद्यापही काही कंपन्यांचा विरोधातील केस या कोर्टात टाकल्या आहेत.
सोबत पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. या अतंर्गत सरकारी योजनांचा जन सामन्यांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल या दिशेने काम करत आहेत. त्या सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या अतंर्गत विविध समाजपयोगी उपक्रम त्या राबवत असतात. समाजातील तळागाळातील लोकांचा समस्या ओळखून त्यावर काम करणे ह्या दृष्टीकोणातून काम करत असतात. मागील आठवड्यात त्यांनी भव्य लसीकरण मोहीम राबवत जे लोक लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाही अशा मजूर व जन सामान्य लोकांना लसीकरणाचा लाभ मिळवून दिला. असे समाज उपयोगी कार्यक्रम हे सुचित्रा महाजन हे राबवित असतात.
त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जळगाव जिल्हा शतक महोत्सवा निमित्त सामाजिक योगदान पुरस्कार, मिलींद सामाजिक विकास मडंळाकडून आदर्श समाजसेवा पुरस्कार, कुसमु -लक्ष्मी मेमोरियल फाऊंडेशन व मुळजी जेठा महाविद्यालयाकडून खान्देश सन्मान, सक्षम पोलीस टाइम्स कडून सक्षम महिला रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सुचित्रा महाजन सन्मानित झाल्या आहेत. त्यांचे सामाजिक कार्य हे न थकता न थांबता असेच अविरत चालू आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून हे कार्य निरंतर सुरु राहील, असा मानस त्यांनी बोलून दाखविला.