<
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ जळगाव जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ति सन्मान पुरस्कार सोहळा सद्गुरू बी.पी.एड. कॉलेज सभागृहात संपन्न झाला.
या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ४९ महिला क्रीडा शिक्षिका व महिला क्रीडासंचालीका यांना जिल्हास्तरीय क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.जयंती पराग चौधरी, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, क्रिमिनल लॉयर अँड.सेजल कदम, पोलीस उपनिरीक्षक योगिता राठोड, स्कायनेटच्या संचालिका पूजा पाटील, उद्योजिका संजना पाटील, नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, एकलव्य क्रीडा पुरस्कारार्थी कांचन चौधरी, शिवछत्रपती पुरस्कार्थी तथा जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, तर आभार प्रदर्शन युवा अध्यक्ष प्रा.डॉ.रणजित पाटील यांनी केले. पुरस्कार्थीतर्फे सविता जाधव, विद्या कलंत्री, छाया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पाटील किशोर पाटील, योगेश सोनवणे, सचिन महाजन, प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.हरीश शेळके, गिरीश महाजन, योगेश पवार, विजय विसपुते, सुनिल वाघ अमळनेर, देविदास महाजन चोपडा, सचिन सुर्यवंशी धरणगाव, के यु पाटील यावल, राहुल साळुंखे चाळीसगाव, गिरीश पाटील पाचोरा, अनंतराव जाधव जामनेर, मनोज वाघ यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा क्रीडा नारीशक्ती सन्मान पुरस्कार्थी- प्रा.डॉ.अनिता अविनाश कोल्हे (जळगांव), प्रा.डॉ.प्रतिभा भास्कर ढाके (मुक्ताईनगर), प्रा.क्रांती संदेश क्षिरसागर (चोपडा), सुजाता गुल्हाने(क्रीडा अधिकारी जळगाव), विद्या सुधाकर खाचणे(आसोदा), प्रा.माधुरी राजेंद्र नारखेडे(ममुराबाद), प्रा नीलिमा माधवराव पाटील (जळगाव), प्रा अंजली रामदास बन्नापुरे (जळगाव)मीना गणसिंग सिसोदिया (कढोली), स्मिता मुकुंद एडके(जळगाव), सुरेखा दगा पाटील (जामनेर),मंजुषा हेमंत भिडे (जळगाव), विद्या नितीन कलंत्री(जळगाव),जयश्री बालमुकुंद माळी(जळगाव), कांचन सुनील नारखेडे( जळगाव), मीनाक्षी श्यामप्रसाद चौधरी(यावल ),दुर्गा देवेंद्र ठाकरे(यावल), कुमुदिनी धर्मराज पाटील(शेंदूर्णी), सीमा रामचंद्र माळदकर (चाळीसगाव ), प्रतिभा शांताराम पाटील(शेंदुर्णी), प्रा.डॉ.कांचन अमोल विसपुते(जळगांव),सविता सत्यवान जाधव (चाळीसगाव ), सुनिता प्रभाकर पाचपांडे (यावल), गीता शंकर सोनूले(यावल), स्निग्धा प्रमोद जोशी(यावल), रत्नप्रभा मुरलीधर पाटील(यावल),अश्विनी योगेश कोळी( यावल), सोनाली सुभाष दारकोंडे (पाचोरा), रोहिणी गोविंद जाधव(पारोळा), कीर्ती रमेश पाटील(जामनेर), रूपा प्रशांत कुलकर्णी(वरणगाव), स्वाती मधुकर चौधरी(चोपडा), मीना ओंकार सपकाळे(जळगाव),प्रा.शालिनी शंकरराव तायडे (जळगांव), रेखा पुना धनगर(चाळीसगाव), वैशाली अरुण चव्हाण (चाळीसगाव),मनीषा सुनील देशमुख(जळगाव), अनिता केशवराव पाटील(चोपडा), वसुंधरा छगन पाटील(रावेर), विजया प्रमोद चौधरी (जळगांव), सरला तुषार झांबरे (जळगांव), रत्नमाला शालिग्राम सोनवणे(अमळनेर), समिधा संदीप सोवनी (जळगाव), सरस्वती प्रकाश पाटील(जळगाव), छाया संदेश पाटील(जळगाव), हर्षदा मनोहर सूर्यवंशी(अमळनेर), वंदना नंदकिशोर तिवसकर (जळगाव),कोमल हिंमत पाटील(जळगाव), श्वेता चंद्रकांत कोळी(जळगाव)