Thursday, July 24, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा; मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
रावण दहन कार्यक्रमास अटींवर परवानगी; नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया ऐवजी आरोग्य विषयक राबवावे -जिल्हाधिकारी

नोव्हेंंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पात्र लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन

जळगाव(जिमाका)- कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत.

या मोहिमेतंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वार्डासह गल्ली, प्रभागात सर्वसामान्य नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख २८ हजार १३४ पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

यात १९ लाख ३ हजार १८७ नागरिकांना पहिला तर ६ लाख २४ हजार ८६४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणास पात्र लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ पासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास आली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर २१ जूनपासून जिल्ह्यातील १८ वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरीकांकडून स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद दिला जात आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत. या लसीकरण केंद्रामार्फत आतापर्यंत शहरी भागातील १० लाख ३९ हजार ९८४ लाभार्थ्यांना तर ग्रामीण भागातील १४ लाख ८८ हजार १५० लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात १९ लाख ३ हजार १८७ जणांना पहिला डोस तर ६ लाख २४ हजार ९४७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील ४ लाख ४८ हजार १६६ पेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणात सहभाग नोंदवला आहे.

तालुकानिहाय झालेले लसीकरण- जळगाव-५३२८६७, भुसावळ-२५२८०७, अमळनेर-१६४५७५, चोपडा-१७०५३१, पाचोरा-१६४७४८, भडगाव-९५८२०, धरणगाव-९६१०३, यावल-१४०२६४, एरंडोल-९४५६२, जामनेर-१८१७६३, रावेर-१६४३३८, पारोळा-१०४४०६, चाळीसगाव-२३५४३४, मुक्ताईनगर-८४१०३, बोदवड-४५८१३ असे एकूण २५ लाख २८ हजार १३४ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

मिशन कवच कुंडल मोहिमेत नागरिकांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी

सद्य:स्थितीत संसर्ग साखळी खंडीत होत असली तरी आगामी सण, उत्सवाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून दर आठवड्यात पुरेश्या प्रमाणात लसीचा मात्रा जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. कुठेही लसीची कमतरता नाही. लसीच्या उपलब्धतेनुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 1 ते 3 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही किंवा लसीचा पहिला डोस घेउन विहित कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा नागरिकांनी मिशन कवच कुंडल मोहिमेत आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन स्वयंस्फूर्तीने लसीकरणात सहभाग नोंदवावा. सद्यस्थितीत लसीकरणाला आलेली गती पाहता नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यत पात्र नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी संसर्ग प्रादूर्भाव टाळण्यासाठी लसीचे दोन डोस घेतले असले तरी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर यश मिळवणं कठीण नाही -अमित माळी; राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Next Post

उपमुख्यमंत्र्यांनी केली विकासकामांची पाहणी

Next Post
उपमुख्यमंत्र्यांनी केली विकासकामांची पाहणी

उपमुख्यमंत्र्यांनी केली विकासकामांची पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications