<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील मिना बाबुलाल परदेशी या १८ वर्षापासून तांबापुर जळगांव येथे अंगणवाडी सेविका म्हणुन कार्यरत आहे.
नेहमी गरोदरमाता, स्तनदामाता, ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, किशोरीवयीन मुली यांचे आरोग्यात्मक व आहारात्मक विशेष काळजी घेतात. महिन्यात दोनदा पालक सभा घेवून त्यांना विविध माहिती देवून मार्गदर्शन करतात. गरोदरमाता यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे म्हणुन वार्डातील २५ गरोदरमातांना लसीकरीता तयार केले.
० ते २ वर्ष वयोगटातील बालकांचे लसिकरण १००% व्हावे व त्यांचे कुपोषण दुर व्हावे यासाठी कार्यरत आहे. तसेच आधार कार्ड १००% निघावे म्हणुन नेहमी तत्पर असतात. बेटी बचाओ बेटी पढाओ हा उद्देश ठेऊन मुलगी जन्माला आल्यावर त्यांच्या घरी जावून स्त्री जन्माचे स्वागत बेबी केयर कीट व गुलाब पुष्प देवून स्वागत करतात. कोरोना काळात झोपडपट्टीत जाऊन रोज १०० घरांचा सर्वे करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. रोगप्रतिकारक गोळ्या वाटप केल्या. दवाखान्याची माहिती देवून मार्गदर्शन केले.
किशोरी मुलींना अँनिमिया पासुन रोखता यावे म्हणुन महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधून रक्त वाढीच्या गोळ्या नेहमी वाटप करत असतात. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, सच्ची निस्वार्थ शक्ति सेवा, मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊंडेशन आदी संस्थेत समाजकार्यत लावून अन्नदान, वस्त्र दान, ब्लॅंकेट वाटप, शालेयपयोगी किट्स वाटप करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श अंगणवाडी सेविका, बेटी बचाओ बेटी पढाओ, कोरोना योध्दा, नवदुर्गा, नारी शक्ति, आदर्श शिक्षिका आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.