<
पाळधी(वार्ताहर)- येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज नवरात्री निमित्ताने “जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमा अंतर्गत आज सर्प मित्र तनिष्का शिरसाठ यांना आमंत्रित करण्यात आलं होत. या वेळी तनिष्का शिरसाठ यांनी सापाच्या अनेक जाती प्रजाती बद्दल सखोल अशी माहिती दिली. सोबतच मनात सापाबददलची असणारी भिती सुद्धा दुर केली.
यावेळी विद्यार्थीनीनी विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून सापाबददलची असणारे गैरसमज किंवा अंधश्रद्धा सुद्धा दुर केल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि.नरेश पी. चौधरी यांचा हस्ते तनिष्का शिरसाठ यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी शाळेचे प्राचार्य महेश कवडे, समन्वयक. जी.डी.पाटील व विद्या पाटील व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.