Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

मुंबई(प्रतिनिधी)- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण सर्व्हेक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री श्री.संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये राज्याला स्वच्छ राज्य म्हणून गौरविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र आतापर्यंत पुढे आहे. महाराष्ट्र नेहमी पुढे राहून प्रथम क्रमांकावर असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

दि. २ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील ७७५ गावे हागणदारीमुक्त अधिक शौचालययुक्त (ODF+) घोषित करण्यात आली आहेत. मार्च, २०२२ पर्यंत एकूण १९,६२४ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) घोषित करावयाची आहेत. त्यासाठी नियोजन करावे.जून २०२० नंतर केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर जिल्हा स्तरावरुन एकूण ४३६८ सार्वजनिक/सामुदायिक शौचालयांकरिता नोंदणी करण्यात आलेली असून त्यापैकी २४८५ शौचालयांची बांधकामे पूर्ण झालेली आहेत. तर उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यस्तरावरुन दि. १५ जून, २०२१ रोजी ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कृती आराखडे तयार करण्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत राज्यातील एकूण ९९७१ गावांचे प्रारुप आराखडे तयार करण्यात आले आहेत. उर्वरीत आराखडे लवकर तयार करावेत, अशा सूचनाही श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटीबद्ध रहावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू -ऊर्जामंत्री

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैशाली नगर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू -ऊर्जामंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo