<
प्रतिनिधी (एरंडोल)- गणेशोत्सवाच्या आधी अंजनी धरणात समाधानकारक जलसाठा झाला असुन सलग ४ ते ५ दिवसांपासुन एरंडोल तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सवाला उस्त्साहात प्रारंभ झाला.एरंडोल येथे विस सार्वजनिक गणेश मंडळांनी व १५ खाजगी मंडळांसह काही लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत भगव्या चौकातुन आपापल्या गणेश मुर्तीची मिरवणुक काढुन वाद्यांच्या तालावर थिरकत श्रीं ची स्थापना केली.विशेष हे कि एरंडोल येथे सार्वजनिक गणेश मंडळ दहा दिवसाचा गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे या वर्षीही साजरा करीत आहे.
गणेश उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची एरंडोल शहराला परंपरा आहे.या उत्सवातून नेतृत्व करण्याची गुण व संघटन कौशल्य यांना वाव मिळत असल्याने नवनवीन नेतृत्व उदयाला येते.दरम्यान प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसिदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी सर्व मंडळांनी गणेशोत्सव शांततेत व अनाठाई खर्चाला फाटा देत साजरा करून पूरग्रस्ताचे आसु पुसण्यासाठी त्यांना भरीव मदत करावी असे आवाहन केले आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागातील ३२ गावांपैकी खडकेसीम,खडके खु.,धारागीर,नंदगाव व पातरखेडे या पाच गावांना ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.विविध देखावे व मोठाल्या विद्युत रोषणाई यावर खर्च न करता बचत केलेला पैसा सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्त निधी म्हणुन तालुका प्रशासनाकडे द्यावा अशी जाणकारांची अपेक्षा आहे.