<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- एकविसाव्या शतकात ग्रामीण जनता आता बरीच पुढारली…! मात्र नित्याने शेतात जाण्यास उपयोगी असणारा लोंढे येथील चिंचगव्हाण शिवार रस्ता मात्र बनण्याच्या प्रतीक्षेत होता. कित्येक निवडणुका, मेळावे, बैठका ह्या रस्त्यांच्या दुरुस्ती- बांधणीवरुन होऊन गेल्या, “हा रस्ता तेवढा झालाच पाहिजे..!” असा दु:खद सुर लोकांमधून नेहमी निघायचा.
रस्त्याच्या बाबतीत लिहायचं म्हटलं तर दूर पर्यंत पसरलेल्या सगळी कोरडवाहू अर्थात फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे. शेती करायची म्हणजे पावसाळ्यात जाणं-येणं झालंच…! खरंतर हा एकूण दोन किमी लांबीचा रस्ता आदी ते अंतापर्यंत खडतरच…! पण दुर्दैवाने शेतकऱ्यांना यावरून जावेच लागायचे. त्यातील एक किलोमीटर चा रस्ता म्हणजे अवघडच..! प्रचंड चिखल, पाण्याने भरलेले डबके, दुतर्फा झाडे झुडपांनी वेढलेला, ना पायी जाता येई. ना बैलगाडी, कुणी गेलंच तर तर पाय रुतून बसे. बैल, शेळ्या, मेंढ्या त्या ठिकाणी फसून मेल्याचं उदाहरण अनेकांनी पाहिलं आहे.
अनेकदा काढलेली पिके महिनो महिने शेतात ठेवावी लागे. काही शेतमाल डोक्यावर घेऊन आणावं लागे. चिखलात पाय फसत दुसरा पाय काढत अंतर कापावं लागे आणि म्हणून या रस्त्यास पर्यायी रस्ता म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शेती …! मग त्या शेतांतील पिकांचे प्रचंड नुकसान होत असे. हा एवढा रस्ता झाला पाहिजे ही प्रत्येकांची मागणी पण करणार कोण…? हा प्रश्न होता आणि हा रस्ता कित्येक वर्ष तरी होणार नाही यावर देखील लोकांना ठाम विश्वास होता. ही वाट सुखाची करण्याचा विचार काही धडपड्या शेतकऱ्यांनी केला आणि आमदार मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांतर्गत विषयी ऐकले व प्रकल्प समन्वयक राहुल राठोड यांच्या माध्यमातून मंगेश दादा व गुणवंत दादा सोनवणे यांची भेट घेतली.
सदर रस्ता करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केलेआमदार मंगेशदादा चव्हाण व मा.गुणवंतदादा सोनवणे यांनी सेवा सहयोग फाउंडेशन कडून जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले व शेतकऱ्यांकडून डिझेल खर्चासाठी वर्गणी करण्यात आली आणि कामाचा श्रीगणेशा केला….! २ किमी लांबीचा रस्ता केवळ ३०० लिटर डिझेल बनवून तयार झाला. यात शासनाचा अंदाजे ६ ते ७ लाख रुपये वाचले हे विशेष आणि यासाठी शेतकरी गेल्या ४० वर्षापासून वाट पाहत होते.शिवनेरी फाउंडेशन अंतर्गत भूजल अभियानाअंतर्गत शिवार रस्ता बनविण्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण व गुणवंत दादा सोनवणे यांनी मौलिक मदत केल्याने शेतकऱ्यांची समस्या चुटकीसरशी सुटली. यामुळे शेतकरी आज दोन दोन गाड्या एका वेळेस पास होईल असा रस्ता तयार झालात्याचे लोकार्पण आ. मंगेश दादा चव्हाण व गुणवंत दादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स. सदस्य पियूष साळुंखे, जि.प. अनिल गायकवाड, प्रा.सुनिल निकम, नगरसेविका सविताताई राजपूत, सरपंच राहुल सोनवणे, उपसरपंच जयाजी भोसले, राजु पवार, भैया देवरे, प्रविण राठोड, सायबु निकम, हिरामण सोनवणे, निवृत्ती जाधव, तुकाराम जाधव, रमेश निकम सुरेश निकम, प्रमोद निकम, कांतीलाल जाधव, अनिल सोनवणे, चेतन भोसले, अरुण ठाकरे, भानुदास भोसले, शिवाजी निकम, हर्षल जाट, ललीश शिंदे, एकनाथ निकम, विठ्ठल निकम, दगडू निकम, नगराज निकम, विजय भोसले, आदी उपस्थित सर्व ग्रामस्थ ग्रा.पं.सदस्य, शेतकरी उपस्थित होते.