<
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील ओझर बु.शिवारातील पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशाने दारूच्या भट्टया जामनेर पोलिसांनी उध्वस्त केल्या. तालुक्यात दारूबंदी मोहीम राबविण्यात येत असून अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रथम मुंडे यांच्या नेतृत्वात ओझर येथील काही लोक गावठी हातभट्टीची दारू व त्याची विक्री करत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने जामनेर पोलीस स्टेशनचे पी. आय. प्रताप इंगळे यांनी पीएसआय विकास पाटील, स.फौ.संजय पाटील,पो.हेड.विठ्ठल काकडे, पो.कॉ. निलेश घुगे यांचे पथक तयार करून ओझर गावाच्या शिवारात चांग बिल्डिंगच्या पायथ्यालगत झाडाच्या आडोशाने पायी लपत-छपत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले असता सदर ठिकाणी खालीलप्रमाणे आरोपी गावठी हातभट्टीची दारू काढताना आढळून आले. तसेच दारू गाळण्याचे साहित्य पोलिसांनी जमा केले. पोलिसांना पाहताच बाकीच्यांनी पळ काढला, त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर दारु विक्रेत्यांचा विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण २६ हजार २६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपघात क्रमांक २४७/२०१९ कलम मुंबई दारूबंदी अधिनियम कलम६५ (फ)(ब)(क)(ई) प्रमाणे आरोपीचे नाव डोंगरची उर्फ डोंगरी कृष्णा भिल, रा.ओझर बु. ता.जामनेर असे असून त्याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जनतेला आव्हान केले आहे ज्या ठिकाणी गावठी दारुच्या भट्टया किंवा गावठी दारू विकताना दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. तसेच संपर्क साधणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.