<
जळगाव(प्रतिनिधी)- मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. प्लेसमेंट झाल्यानंतर आयुष्यात करीयरचे मार्ग खर्या अर्थाने स्पष्ट होतात आणि चालु शेवटच्या वर्षात शिकत असतांना नामांकित कंपनीमध्ये निवड होणे ही खरी कौतुकास्पद गोष्ट असते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) मध्ये निवड झाली आहे. हि संगणक विभागासाठी खुपच गौरवास्पद बाब आहे. संगणक विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी मुसेब शेख (३.३६ ङझअ), मिलींद प्रकाश पाटील (३.३६ ङझअ), इरम शेख (३.३६ ङझअ) यांची टीसीएस या नामांकित कंपनीत निवड झालेली आहे. त्यांना प्रत्येकी ३.३६ लाखाचे प्रत्येक पॅकेज कंपनीमार्फत देण्यात आले आहे. त्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्याच्या यशामध्ये सहकार्याचा मोठा सहभाग हा विभागप्रमुख प्रा.प्रमोदगिरी गोसावी यांचा आहे. त्यासोबत विभागातील वरिष्ठ प्रा.डॉ.ज्ञानेश्वर किरंगे, प्रा.निलेश चौधरी, प्रा.निलेश वाणी, प्रा.माधुरी झंवर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. टे्रनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना निवडीच्या संधी सद्यस्थीतीला वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातुन प्लेसमेंट ड्राइव्ह वेगवेगळ्या टप्पयात चालू आहे, त्यामध्ये विप्रो, टीसीएस, इव्होसीस, सुबेक्स, मॉर्गन स्टेनले, डिलॉई, अॅटॉस सिंटेल, जियो डिजीटल लाईक, एनटीटी डाटा, इन्फ्रासॉफ्ट टेक, व्हर्च्युसा, आयबीएम, अॅपल, आयनेक्शर, सीआरएम नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचा समावेश आहे. आगामी काळात या कंपन्यांमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी आहे. आज महाविद्यालयातील संगणक विभागात ६२ विद्यार्थी, यंत्र विभागात ६५, विद्युत विभागात ६७ आणि अणु विद्युत आणि दुरसंचार विभागात १३ विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. या सर्वच विद्यार्थ्यांना या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी व त्यांची यशस्वी निवड होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहे. सर्वच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हमखास निवड होईल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.