<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बु. आणि कंडारी गावातील ग्रामपंचायत विषयी वेळोवेळी वरिष्ठांना निवेदन देऊन अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची आपणाकडून कारवाई झाली नाही. आपण एक प्रथमदर्शनी चौकशी केली असता, त्यात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तरी आपण संबंधितांवर कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. अशा संदर्भातील एक निवेदन जळगांव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. तसेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी भारिप च्या कार्यकर्तेंनी दिला. यावेळी, जळगाव ग्रा.तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, ग्रामीण तालुका सचिव युवराज झाल्टे, युवा अध्यक्ष जितेंद्र साळवे, अनिल निकम, डॉ. पंकज इंगळे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.