<
भडगांव-(प्रतिनिधी) – येथे शासकिय निमशासकिय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी भडगांव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्मचार्यांच्या अनेक मागण्या शासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच महाराष्ट्रातील शासकिय निमशासकिय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची वज्रमुठ तयार झाली आहे. अंशदायी पेंशन योजना ही कुटंबव्यवस्था उध्वस्त करणारी योजना गेली 14 वर्षे राज्यातील कर्मचारी प्राणपणाने मांडत आहेत.
या कर्मचार्यांनी जुनी पेंशन योजना लागु करावी. सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दुर कराव्या. खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचार्यांना कायम करावे. अशा तेरा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या या निवेदनास संजय सोनार, राज्य संघटक,विरेंद्रसिंह राजपुत,पुरोषत्तम कुमावत,रामदास हौसरे,महेंद्र पाटील,अमोल भंडारे,हेमंतकुमार पाटील,संभाजि पाटील, आर.एम.बी.के.एस.जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते.