<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संचलित कामगार कल्याण केंद्र जळगांव व कृती फाउंडेशनच्या जळगांव शाखेच्या वतीने कामगार, त्यांचे कुटुंबिय व इतर गरजू नागरिकांसाठी उद्या दिनांक ३० ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी ११ वाजता कामगार कल्याण केंद्र, जोशी कॉलनी जळगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी कामगार कल्याण केंद्र व कृती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले आहे. पुढे डोळ्यांचे आजार वाढू नये यासाठी त्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी कामगार, त्यांचे कुटुंबिय व इतर गरजू नागरिकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आर.एस. शेख यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदर शिबिराला कृती फाउंडेशन व प्रभाकर पाटील नेत्रालय यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.