<
जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचलित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथे प्राध्यापकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पाच दिवसीय फॅक्लटी डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन दिनांक २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले होते.”इंडस्ट्री 4 चॅलेंजेस बिफोर एज्युकेशन” औद्योगिक गरजा आणि शिक्षण या विषयाशी निगडित विविध पैलूंवर मार्गदर्शन आणि चर्चा या कार्यशाळेत झाली.
टेकनॉलॉजी इव्हॅल्युऐशन, एनबीए एक्रिडिटेशन आणि चॅलेंजेस, नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी, मॅनेजिंग द सेल्फ, अॅडॉप्ट, ऍडीप्ट: बिकम अ फ्युचर- रेडी, इंडस्ट्री-अकॅडेमिया कॉन्वेर्जेन्स अशा विविध औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्वाकांक्षी विषयांचा समावेश करण्यात आला होता. त्यात मुंबई, वल्लभ विद्यानगर, एसपी विद्यापीठ गुजरात, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ तसेच राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरांवरील तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात मुख्यत्वे डॉ कामिनीबेन शाह, डॉ मोहन अग्रवाल, डॉ सोनाली टिपरे, श्री हरीश शेट्टी, डॉ सुनील पाटील, प्रा डॉ प्रिती अग्रवाल , डायरेक्टर डॉ. म्रगना गुप्ता श्री प्रतीक हक, प्रो.डॉ.अनिल डोंगरे, प्रो. आशुतोष मिसळ ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता, उमवि परीक्षेत्रातील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेत सर्व प्रथम उपस्थिती नोंदवून प्राध्यापकांशी संवाद साधला.
कामीनीबेन शहा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जुळवुन घ्या, पारंगत व्हा, नवीन गोष्टी, टेक्नाॅलाॅजी शिक्षण तंत्रज्ञान उद्योग आत्मसात करा भविष्यासाठी तयार व्हा असे आवाहन केले. ज्ञान अद्ययावत करा, विवीधता निर्माण करा आणि भविष्याचा प्रवास सुरु करा. सध्याचे इंटरनेट वापर करणारे 450 मिलयन, स्मार्ट फोन वापर करणारे 298 मिलियन, सोशल मिडीया वापरणारे 250 मिलीयन, हे डिजीटल भारताचे आजचे चित्र आहे. ते डोळ्यासमोर ठेऊन आभ्यासक्रमाच्या बदलाचा गांभिर्याने विचार आम्ही केला पाहिजे. शिक्षकांनी “आयुष्यभरासाठी शिक्षण” करत आपली आणि विद्यार्थ्यांची क्षमता विकसीत केली पाहिजे. त्यादृष्टीने धोरण विकसीत झाले पाहिजे. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ मोहन अग्रवाल (प्रेसिडेंट इंफोगल्फ असो) यांनी डिप लर्निग वर भर देत शिक्षकांनी वैविध्यपूर्ण पध्दतीने कसे शिकवावे याच्या महत्त्व पुर्ण सुचना केल्यात.
दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ सोनाली टिपरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “उद्योग शैक्षणिक अभिसरण” शैक्षणिक-उद्योगासाठी त्यांच्या एकत्रित कामासाठी 4.0 धोरणाचा उद्देश आणि महत्व सांगितले. विवीध क्षेत्रातील त्याची गरज लक्षात आणुन दिली. दुपारच्या सत्रात हरीष शेट्टी (उपाध्यक्ष, डकाॅनइन्फरा टेक्नॉलॉजी लि) यांनी व्यवस्थापन शिक्षणातील अव्हाने सांगत ओद्योगिक क्षेत्रातील संलग्नतेवर भर दिला.
तिसर्या दिवशी डॉ सुनील पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ब्लाॅकचेन टेक्नॉलॉजी, त्यातील पारदर्शकता, नटशेल या संकल्पनेबरोबरच, ऐ आय टेक्नॉलॉजी आणि फेसलेस, पेपरलेस, कॅशलेस, संकल्पना या डिजीटल परीवर्तनात महत्त्वाच्या ठरत आहेत. त्याविषयी विस्तृत माहिती देतांना हजारो प्रकारच्या डिजीटल सर्व्हेंची विवीध क्षेत्रातील गरज प्रतिपादन केली, त्यातील की ट्रेन्ड संशोधन अधोरेखित केले. दुपारच्या सत्रात प्रा डॉ प्रिती अग्रवाल यांनी ओद्योगिक शैक्षणिक समन्वयावर भर देत स्टेकहोल्डर आणि शैक्षणिक प्रभाव क्षेत्रातील प्रमाणित अभ्यासक्रम, प्रोफेशनल उन्नती, आणि पुरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नरत राहाणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले. त्यानंतरच्या वक्त्या डॉ मृगना गुप्ता यांनी, कोणतीच संकल्पना मुर्खपणाची नसते. प्रत्येकीत काही नवजाणिवा दडलेल्या असतात. तुम्हाला त्या शोधता आल्या पाहिजे.
चौथ्या दिवशीच्या प्रथम सत्रात श्री प्रतिक हक (सर्हिफाय ईंडीया बिझीनेस हेड, मुंबई) यांनी टेकनाॅलाॅजी ईव्हाॅल्युएशन आणि त्याचा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या आभ्यासक्रमातील स्कीलवरील परीणामांवर चर्चा केली. अॅटोमेशन आणि ऐ आय मधील संधी त्यांनी विस्ताराने सांगितल्या. त्यानंतर प्रा डॉ अनिल डोंगरे (डायरेक्टर, मॅनेजमेंट स्कूल, उ म वि) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर साधकबाधक चर्चा केली. त्यामागील तत्वे, भुमिका, बी स्कुल आणि टी स्कुल परीणाम, मेरा प्राॅब्लेम् मेरा सोल्युशन हि शिक्षकांची थीम असायला हवी यावर आपले महत्त्व पुर्ण मत नोंदवले.
त्यांनंतर पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात डॉ अशितोष मिसल (डायरेक्टर डी वाय पाटील मॅनेजमेंट स्कुल) यांनी एन बी ए अक्रीडेशन क्षेत्रातील आव्हानाची सविस्तर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने पी ई ओ, व्हीजन मीशन, क्वालिटी पाॅलीसी यावर अनेक महत्वपूर्ण सुचना त्यांनी दिल्यात.संपुर्ण कार्यशाळा आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ अनुपमा चौधरी यांच्यासह आय एम आर प्राध्यापकांच्या टिमने यशस्वीरीत्या पुर्णत्वास नेली. कार्यशाळेतील सर्वांचे आभार एम बी ए समन्वयक डाॅ पराग नारखेडे यांनी मानले.