<
भडगांव-(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित शासकीय तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा आदर्श कन्या विद्यालय,भडगावच्या मैदानावर पार पडल्या,या स्पर्धेत १९ वर्षाआतील गटात क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव,संचलीत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुलींच्या संघाने आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपल्या गटातील कबड्डी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयश्री खेचुन आणली तसेच १७ वर्षाआतील मुलींच्या गटातही गो.पु.पाटील,माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. कबड्डीतील अंतिम सामन्यात मुलींनी आदर्श कन्या विद्यालय,भडगाव संघाचा डावाने पराभव करुन विजय संपादन केला.विजयी संघात रुपाली पाटील,प्रियंका पाटील,ललीता कोळी,अपर्णा मराठे,निकीता परदेशी,सपना मोरे,मनीषा करंकाळ,फरहाना कौसर,प्राजक्ता जोशी,आदिंनी उत्कृष्ट खेळ केला.विजयी मुलींच्या संघास व्यवस्थापक म्हणून सौ.सोनाली सोनवणे तर राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी हे मार्गदर्शक म्हणून लाभले तसेच उपविजयी संघास व्यवस्थापक म्हणून क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार तर मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे हे लाभले.विजयी तसेच उपविजयी संघांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामदादा भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.