<
धरणगाव-(प्रतिनिधी)- सध्या वाळूची किंमतीला बाजारात वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील वैजनाथ शिवारात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे.
प्रशासनाकडून अपेक्षित वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व वाळू विकून अपाम पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून दररोज जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोमाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.