<
जळगाव(जिमाका)- खरीप 2022 हंगामात वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी/उन्हाळी 2021-22 हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क (8669642722) साधून आपले आरक्षण नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी केले आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन फुलेकीमया, फुलेसंगम, एम.ए.यु.एस- 612 हे वाण अनुदानावर मिळणार आहे. या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरीच बियाणे मिळण्यास पात्र राहणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी कळविले आहे.