<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक लि. ने बँकेचे सन्मानिय ठेवीदार व जेष्ठ सभासद चंद्रकांत हुना तळेले यांचे हस्ते लक्ष्मीपूजन करून नवीन पायंडा पाडला आहे.
साधारणपणे कोणत्याही सहकारी बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते दर दिवाळीला पूजन होत असते. पण गोदावरी लक्ष्मी बँकेने बॅकेंचे ठेवीदार व सन्मानिय जेष्ठ सभासद चंद्रकांत हूना तळेले यांच्या हस्ते पूजन करून घेत नवीन पायंडा पाडला आहे. यावेळी गोदावरी लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाषदादा पाटील, डॉ वर्षाताई पाटील, सी ए व तज्ञ संचालक सुनिल महाले, सुरेश झोपे, राजेंद्र कुरकुरे, बॅकेचे सभासद भारंबे, डॉ अनिकेत पाटील, डॉ सुषमाताई सुभाष पाटील, व्यवस्थापकिय संचालय अशोक टी महाजन, शिंदे, नितीन भंगाळे, राजश्री महाजन, व इतर कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. बँक व ग्राहक यांचे जिव्हाळयाचे नाते असते आणि यातूनच परिवार निर्माण झाला आहे.
प्रत्येक वर्षी अध्यक्ष पूजा करतात पण माजी खा. डॉ उल्हास पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी यावेळी ठेवीदार व जेष्ठ सभासद यांच्या हस्ते पूजा करावी अशी संकल्पना मांडत जेष्ठ सभासद चंद्रकांत हुना तळेले यांना पूजेसाठी आमंत्रित केले होते. यावेळी इतर सभासद व ठेवीदारांना देखिल शुभेच्छा देण्यात आल्यात.