<
जळगाव(प्रतिनिधी)- कृषी व कृषिसंलग्न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर झाले असून जळगाव भुसावळ महामार्ग ६ खिर्डी शिवारातील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात समुपदेश व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून विद्यार्थ्यांनी केंद्रावर येवून ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन कृषी शिक्षण,संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ.अशोक चौधरी यांनी केले आहे.
सीईटी सेलकडून व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक पदवी प्रवेशपूर्व परिक्षांचे निकाल जाहिर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी मान्यता दिल्यावर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठ अंतर्गत कृषी, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर केले आहे.राज्यातील शासकीय अनुदानित तसेच विना अनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबर पर्यत www.ug.agriadmission.inसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. २,७ आणि १३ डिसेंबर या दिनांकाला गुणवत्तेनुसार तीन फे—यात प्रवेश होतील. तसेच २० डिसेंबरपासून जागेवर प्रवेशफेरी होणार असून संस्था स्तरीय प्रवेशफेरीस दिनांक २३ डिसेंबरपासून सुरूवात होईल.
या संपूर्ण प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या करीता महाराष्ट्रात समुपदेशन केंद्राची स्थापना तसेच ऑनलाईन अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून खान्देशातील राहुरी विद्यापिठार्तंगत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाने देखिल पुढाकार घेत समूपदेश व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहितीसाठी कृषी शिक्षण,संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ.अशोक चौधरी ९४०३२४९६४० व उपकुलसचिव अतुल बोंडे ८९९९०७१९८७ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.