<
जळगाव -(जिमाका)-येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून नागरीकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलेत.
या बैठकीस वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, महावितरणचे श्री. शेख, राष्ट्रीय महामार्गचे श्री. सिन्हा यांचेसह जिल्हा परिषदेचे व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.