<
जळगांव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे आज शाडू मातीचे पर्यावरण पुरक श्रीगणेश बसविण्यात आले होते. सर्व गणेश मूर्तींचे आज पाळधी ग्रामपंचायत येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथील नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे कला शिक्षक गुणवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः शाडू मातीचे, मेणाचा, विविध झाडांच्या पानांचे, विविध धांन्याचे, कागदांचे अशा विविध टाकाऊ वस्तूंपासून श्रीगणेशाची विविध रुपे साकारली होती.
प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते केले. त्यांच्यासह जेष्ठ पत्रकार उमेश झंवर, शाळेच्या अध्यक्षा सौ.अर्चना सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्वला झंवर, गुणवंत पवार, सतिश पाटील, ग्रामस्थ व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांसह गावातील ग्रामस्थांनी मुलांच्या कौशल्याचे कौतुक करुन जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व जेष्ठ पत्रकार उमेश झंवर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून प्रोत्साहनपर त्यांना पेन्सील, रबर, शार्पनर देऊन उत्तेजित केले.