<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दि १८ रोजी कार्तिका पोर्णिमा सूरू होत असल्याने दु.१२ वा पासून दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.कार्तिकी पोर्णिमानिमीत्त जय्यत तयारी सूरू कोविड नियमांचे पालन करावे लागणार.संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते.
या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. येथे केलेेला नवस पुर्ण होतो अशी आख्यायीका अनुभवावरून आलेली आहे.कार्तिक पौर्णिमानिमीत्त मंदिरात जय्यत तयारी सूरू असून कोविड आपत्तीत शासनाच्या नियमांचे पालन करीत भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. यात मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तरी भाविकांनी नियमांचे पालन करावे या साठी कार्यकर्त्यांची फौज लक्ष घालणार आहे.
मंदिर सजावटीचे काम पुर्णत्वास आले आहे. ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांनी आज कार्तिक पौर्णिमा उत्सव दि १८ नोव्हें रोजी पोर्णिमा प्रारंभ दु.१२ वा. पासून सूरू होउन दि २० नोव्हें रोजी समाप्त होत आहे. कार्तिक पौर्णिमा १८ नोव्हेंबरला १२ वा. सूरू होवून १९ नोव्हेंला पहाटे २ वा २६ मि. समाप्ती होते तर पहाटे २वा.३३ मि. कृतिका नक्षत्र सूरू होवून १९ नोव्हेंबरला दु २ वा ३६ मी. समाप्ती होते. कृतिका नक्षत्र काळात दर्शन घेतल्यास अत्यंत महत्वाचे समजले आहे. तसेच कार्तिक नक्षत्र २० नोव्हेंबर सकाळी समाप्त होत आहे.
यामूळे १८ नोव्हे ते २० नोव्हे असे तिन दिवस भगवान कार्तिक स्वामी मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदीरात अभिषेक करण्याची व्यवस्था देखिल केली असते. तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे सांगत आवाहन केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.