Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन

जळगाव(प्रतिनिधी)- उद्योजकता हा एकाकी प्रवास आहे. त्यामध्ये आपल्याला अपयशाला न घाबरता वेगवेगळ्या प्रात्याक्षिकावर काम करणे गरजेचे असते. काही वेळेस इनोव्हेशनमध्ये अपयश येणे हेही फायदेशीर असते कारण अपयशानंतर व्यक्‍ती अधिक जागरुक होवून अचूक बनतो आणि नवनविन संधीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. त्याकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इनोव्हेशन व स्टार्ट अप वर मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टीट्यूशन इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनारसाठी प्रमुख वक्‍ते म्हणून १०००० स्टार्टअप इंडियाचे को-फांऊडर अ‍ॅड सीईओ लिनेश सिंग हे उपस्थीत होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, महाविद्यालयाचे अ‍ॅकेडमीक डिन प्रा.हेमंत इंगळे हे उपस्थीत होते. प्रास्ताविकात डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप संदर्भात विस्तृत माहिती देताना, त्याचे महत्व समजावून सांगितले. उच्चशिक्षणासंबंधित तसेच उद्योगजगतेबाबत सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यासंबंधित असलेल्या निधींबद्दलही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्टार्टअप साठी नेहमी तयार असावे व त्यासाठी प्रयत्नशीलही असावे, असे आवाहनही डॉ.पाटील यांनी केले.

याप्रसंगी लिनेश सिंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि स्टार्ट अप या विषयावर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासु वृत्‍ती बाळगणे गरजेचे आहे, जेणेकरुन नवनविन स्टार्ट अप च्या कल्पना वाढीला लागतील. तसेच स्टार्ट अप सुरु करण्यासाठी प्रथम अडचणींवर लक्ष केंद्रित करायचे आणि त्यानंतर जे उत्‍तर येईल तेच आपले स्टार्ट अप असते असे मानावे, असे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना स्पष्ट करुन दिले.

एक विद्यार्थी ते सीईओ ऑफ १०००० स्टार्ट अपपर्यंतचा प्रवास अतिशय रंजकतेने त्यांनी विद्यार्थ्यांना विषद केला, त्याचप्रमाणे त्यांना यासंदर्भात आलेल्या अनुभवाचे स्टार्ट अप मध्ये परिवर्तन कसे करायचे याचा सुलभ मार्ग त्यांनी समजावून सांगितला. स्टार्ट अप सुरु करण्याआधी प्रोडक्ट व मार्केटवर आपला फोकस असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ते करण्यासाठी विविध मार्ग वापरण्यासंदर्भात महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले. बॅकींग सिस्टीममध्ये व्हेचर फंड अधिक लाभदायक असतो आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांच्या माध्यमातून हा फंड वितरित केला जातो. हि नविन माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

स्टार्ट अप करीत असतांना रिस्क आणि फेल्युअर याकडे लक्ष देणे गरजेचे असते, तसेच नोकरी आणि स्टार्ट अप यातील फरक उदाहरणासहित त्यांनी सांगितला. देशभरात जवळपास ४३००० कंपनी स्टार्टअप मध्ये दरवर्षी येतात. परंतु त्यातील काही निवडक कंपन्यांना स्टार्ट अपसाठी निधी मिळतो आणि काही कंपन्या यशस्वी होतात. स्टार्ट अप मध्ये भागीदारी असेल तर कंपनीचे भागीदार हे वेगवेगळ्या गुणांनी अवगत असले पाहिजे जेणेकरुन स्टार्ट अप लवकर वृद्धींगत होईल.

सेमिनारच्याशेवटी विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप संबधित प्रश्‍नांना त्यांनी मुद्देसुद उत्‍तरे दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंत्र विभागाचे प्रा.योगेश वंजारी यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ कुंदन फेगडे परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

Next Post

केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर उद्यापासून दर्शनासाठी खुले होणार

Next Post
केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर उद्यापासून दर्शनासाठी खुले होणार

केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर उद्यापासून दर्शनासाठी खुले होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo