Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बदलता भारत- फिरोज शेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

या भारतात बंधुभाव नित्य वसू देदेवरचि असा दे !असं मागणं मागताना या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची आजही आठवण येते. स्वतंत्र भारत ते आपल्या हाती सोपवून गेले. मग या देशाचे स्वातंत्र्य टिकवायलाच हवे.”जननी जन्मभूमी स्वर्गदपि गरीयसी” असं प्रभू रामचंद्र यांनी केलेले वर्णन अगदी योग्यच आहे. एक काळी हा भारत देश ‘सोन्याचा देश’ असं म्हटलं जाई. भारत हा खंडप्राय देश असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचे कौतुक होते.भारतीय असण्याचा वाटेमनापासून अभिमानबलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्रमाझा भारत देश महानअसे प्रत्येकास वाटते कारण आपल्या भारत देशाचा राज्यकारभार संविधानाप्रमाणे चालतो. ‘या देशाचा मी कोण?’ याचं उत्तर मी कोण सांगणार दस्ताऐवज म्हणजे भारतीय संविधान. हे संविधान स्वतंत्र भारतात मिळालेली अनमोल देणगी आहे. समृद्ध आणि बलशाली भारत देशात इंग्रजांनी सुमारे दिडशे वर्ष राज्य केले आणि देश परकीयांच्या गुलामगिरीत होता.कित्येकांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले रक्त सांडले, कित्येकांनी तुरुंगवास भोगला तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य आज आपण पाहत आहोत.आपली राज्यघटना आपला तिरंगा आपले राष्ट्रगीत आपली धर्मनिरपेक्षता सर्वधर्मसमभावना स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समता ही मुल्ये. आपली आध्यात्मिक प्राचीन संस्कृती, होऊन गेलेले संत, महात्मे ऋषीमुनी आपली तीर्थस्थाने आणि आपली एकत्र कुटुंबव्यवस्था या गोष्टी एकात्मता दर्शवतात. देशात कोणतेही संकट आले मग ते नैसर्गिक असो वा इतर सारे एकजुटीने एकमेकांना मदत करतात. विविधतेत एकता असून एकमेकांचा आदर करतात. परंपरेचा वारसा लाभलेली संस्कृती असून ती जोपासली जाते.‌ आज आपण स्वातंत्र्य मिळवून ७२ वर्षे पूर्ण करण्याचा आनंद साजरा करीत आहोत.१५ ऑगस्ट १९४७ पासून आजपर्यंत आपण मोठी वाटचाल केली आहे. अनेक संस्थाने प्रदेश यांची गुंफण करून या देशाची निर्मिती झाल्यावर आपल्या देशाने आता जागतिक स्तरावर आपले बळ सिद्ध केले आहे. भारतीय व्यक्ती बहुराष्ट्रीय व्यवसायाचे नेतृत्व करत आहोत. बॉलीवूडच्या चित्रपटांनी विविध ठिकाणी चाहते निर्माण केले आहे. आपले खेळाडू जगभर भारताचा झेंडा फडकवत आहोत. इस्रोने तर भारताचा झेंडा अवकाशतही उंचावला. आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी वैशिष्ट्यपूर्ण घटना घडायची आहे ती म्हणजे आपला देश तरुणांचा देश बनणार असून आपल्या देशातील तरुणांची क्षमता आणि आपले प्राचीन काळापासूनचे ज्ञान यांची उत्तम सांगड जर आपण घालू शकलो तर भारत हा उद्याचा आघाडीचा देश म्हणून लौकिक मिळविणार.‌ पूर्वीचा अश्मयुगातील मानव कंदमुळे खाऊन जगणारा त्यातच कालांतराने अश्मयुगातील झालेली क्रांती म्हणजे चाकाचा शोध, अग्नीचा शोध, शेतीचा शोध हळूहळू कालांतराने प्रगती होत जाऊन आज तो चंद्रावर, मंगळावर जाऊन पोचला. पुढे नॅनो तंत्रज्ञानावर शोध असून नॅनो युग येईल. रोबोटच्या या युगात माणसाचे शारीरिक कष्ट होऊन त्याचा बौद्धिक स्तर उंचावला त्याचे राहणीमान उंचावले. आज आपण आधुनिकतेच्या उंच शिखरावर विराजमान झालेले आहोत. स्त्री शिक्षणाची ज्योत १९४८ मध्ये पेटली आणि आज स्त्री चाकोरीबाहेर आपलं अस्तित्व निर्माण करून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडली. अवकाश क्षेत्र ही तिने सोडले नाही. अशी प्रगती देशाची आहे. संगणक युगात सारे वावरत असताना मैलो दूर त्वरित संपर्क आज माणूस साधू लागला. शिक्षण क्षेत्रात भयानक प्रगती होऊन अनेक शाखा उपलब्ध झाल्यात.फेसबुक व्हाट्सएपच्या आधारे तर त्याला जग जिंकल्यासारखे वाटते. अबब केव्हढी ही विलक्षण प्रगती !‌ परंतु राष्ट्रीय एकात्मतेची भावना दिवसेंदिवस नष्ट होत आहे. फुटीर प्रवृत्ती डोकावत आहे. भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असून या जाळ्याचा मोह काहींना आवरता येत नाही.‌ “देश हा देव असे माझा” ही भावना नष्ट होऊन आतंकवाद डोकावत आहे.काही फुटीरवाद्यांमुळे देशावर संकट ओढवते.परंतु काही व्यक्ती आजही तनमनाने देशासाठी झटत आहे. आज भारताचे पंतप्रधान मोदीजी याचे उत्तम उदाहरण आहे. कलम ३७० आणि कलम ३५ ए काढून टाकल्यामुळे जम्मू काश्मीरचा आर्थिक विकासातील मोठा अडसर दूर झाला आहे. आता येणाऱ्या काळात तेथे शिक्षण, उद्योग, पर्यटन व्यवसाय, कृषी क्षेत्र आदी क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्याची सुसंधी उपलब्ध झाली आहे. खाजगी उद्योग तिथे आले तर स्थानिक काश्मिरी युवकांकरिता स्थानिक पातळीवरच रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारचा रोजगार मिळाला तर त्यांच्यात हिंसाचराकडे वळण्याची वृत्ती कमी करता येईल आणि त्यातून या नंदनवनात शांततेची सुवर्ण पहाट उजाडेल. त्यासाठी मोदीजी यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि साऱ्या देशाने या निर्णयाचे स्वागत केले ऑलीम्पिक सुवर्णपदके, नोबेल पुरस्कार वर्ल्डकप इ. नी भारताची मान आज गर्वाने उंचावते.या ‘आपण सर्व एक आहोत’ ही भावना सर्व अडचणींवर मात करण्याचे बळ देते.आपण कळत्या वयापासून “भारत माझा देश आहे ” असे प्रतिज्ञा पूर्वक आणि अभिमानानं सांगतो. ‌ असा हा दिवसेनुदिवस बदलणारा माझा भारत देश.‌ हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे‌ आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे !!!‌

– फिरोज शेख अध्यक्ष- मौलाना आझाद फाउंडेशन, जळगांव .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गुरुजी सारं काही आहे तुमच्यात- सौ.ज्योती राणे

Next Post

शिक्षक दिन विशेष- किशोर पाटील कुंझरकर

Next Post

शिक्षक दिन विशेष- किशोर पाटील कुंझरकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications