Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे  प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

श्री. लोही यांनी म्हटले आहे, खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बस उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची बस स्थानकनिहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहर जुने व नवे बसस्थानक, भुसावळ बसस्थानक, चाळीसगाव बसस्थानक व अमळनेर बस स्थानक येथे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व बसस्थानकांवर प्रवाशांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणचे स्कूल बस वाहतूकदार, खासगी बस वाहतूकदार किंवा मालवाहू वाहतूकदारांशी संपर्क साधत वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

9 नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारातून आजपर्यंत एकूण 74 खासगी बस, 12 स्कूल बस व 592 इतर प्रवासी वाहने प्रवाशांच्या गरजेनुसार या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत पुरविण्यात आलेली आहेत. संप काळात प्रवाशांच्या सोयीकरीत या कार्यालयात नियंत्रक कक्षाची स्थापना केलेली असून दूरध्वनी क्रमांक 0257-2261819 असा आहे. प्रवाशांना वाहनाची उपलब्धता किंवा मागणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी मागणी नोंदवावी.

जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक संघटना व मालवाहतूक संघटना पदाधिकाऱ्यांनी संप कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्याबाबत या कार्यालयास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

Next Post

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह

Next Post
राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo