Wednesday, July 23, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षक दिन विशेष- किशोर पाटील कुंझरकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

माझे वडील स्व.तात्यासाहेब रमेश सहादू पाटील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण धुळे तालुक्यातील बाबरे व निमगुळ येथे त्यांच्या वर्गात माझे पूर्ण झाले. माझे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आमच्या मूळ गावी म्हणजेच चाळीसगाव तालुक्यातील कुंझर तालुका चाळीसगाव येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालय कुंझर शाखेत पूर्ण झाले. दरवर्षी प्रथम क्रमांक सोबतच संस्थेच्या आंतरशाखीय वकृत्व स्पर्धेत सातत्याने सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक मला मिळत गेला आणि माझ्यासोबत माझ्या गावाचे नाव लागत गेले. शिक्षकी पेशाची आवड हळूहळू माझ्या मनात बालपणापासून रुजू लागली. अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे धडे मी शिरूड तालुका धुळे येथील महाविद्यालयातून घेतले. त्यावेळी क्रोप प्रोडक्शन विषयात सर्व गुण मिळाल्यानंतर बीएससी ऍग्री कडे जाण्याचा कल मित्रांच्या व माझ्या मतानुसार माझा तयार झाला. परंतु वडील आदर्श शिक्षक असल्याने व तालुक्यात जिल्हाभरात त्यांचं सेवाभावी व आदर्श वृत्ती सातत्याने मी सोबत राहून पाहिल्याने मी शिक्षकी पेशा स्वीकारणे स्वाभाविक होते आणि म्हणून मी नूतन मराठा अध्यापक विद्यालयात जळगाव येथे माझ डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले, तेथे मित्रांचा मोठा गोतावळा मला मिळाला आणि पाक्षिक शाळेत मुख्याध्यापक पदावर काम करण्याची संधी मिळाली. तदनंतर सप्टेंबर २०००ते मे २०१० पर्यंत जालना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली सर्वत्र किशोर पाटील कुंझरकर हे नाव शैक्षणिक उपक्रमातून पोहचवले. शिक्षक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक संघटनांकडे हळूहळू मी वळता  झालो .तालुकाध्यक्ष ,जिल्हा सरचिटणीस ,जिल्हाध्यक्ष ,एका संघटनेचा राज्य संपर्कप्रमुख राज्य प्रवक्ता अशी,पदे सांभाळता सांभाळता प्रामाणिकपणे कार्य सुरूच ठेवले आणि सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आज  ३८शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांच्या एकत्रित येऊन स्थापन करण्यात आलेल्या राज्य शिक्षण विभाग शिक्षक संघटना राज्यसमन्वय समितीचे राज्य समन्वयक व प्रवक्ते पदाची धुरा सांभाळत आहे. या प्रवासात पुढे जात असताना स्पर्धा परीक्षेत पाळण्या ऐवजी संपूर्णपणे आपोआप मुकलो. आजूबाजूचे व जवळचे अनेक मित्र स्पर्धा परीक्षेतून उच्चपदावर गेले असो सेवेची संधी कुठल्या क्षेत्रात मिळते आपण त्यात कशी आवड निर्माण करतो यावर आपले समाधान अवलंबून असते. हा माझा दृढ विश्वास आणि मी प्रामाणिक सेवा शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात करत राहिलो. राज्यस्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी देखील मधील वेळोवेळी निवड झाली जिल्हास्तरावर आणि प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक राहीलो. स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शाळेतच दाखल करून स्वच्छेने राज्यात सर्वप्रथम सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात २०१०मध्ये तळई तालुका एरंडोल या शाळेपासून केली.तेव्हा शासनाकडून माध्यमाची पुस्तके उपलब्ध होत नव्हती स्वखर्चाने पुस्तक आणून ही शाळा राज्यात सर्वप्रथम संपूर्ण सेमी इंग्रजी माध्यमाची करण्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने यश संपादन केले. डायट जळगाव च्या मदतीने या विषयावर कृती संशोधन करून राज्यस्तरीय संशोधन सादरीकरण परिषदांसाठी माझ्या संशोधनाची निवड झाली आणि आपण हा विषय प्रकाश झोतात आला आज जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी टिकविण्यासाठी सेमी माध्यमाची उपयुक्तता सार्वत्रिक होत आहे. महाराष्ट्र शासन टाटा ट्रस्ट ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने राज्यात मागील वर्षापासून तेजस प्रकल्पांतर्गत टॅग कॉर्डिनेटर पदासाठी शिक्षकांमधून ऑनलाइन अर्ज व मुलाखती घेण्यात आल्या त्यात माझी निवड झाल्याने एरंडोल तालुक्यात इंग्रजी विषयासाठी तेजस प्रकल्पांतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझे सर्व शिक्षक माझे सर्व मित्र परिवार अनेकांकडून जगण्याची शिक्षण मला आपोआपच मिळत गेले. दरम्यानच्या काळात वडिलांचा दुःखद निधन झाल्याने माझ्या मूळ गावी कुंझर तालुका चाळीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला व महादेव मंदिराला मी पितृ स्मरणार्थ भव्य प्रवेशद्वार बांधून देत गावाच्या चांगल्या चांगल्या योजनांमध्ये सहभाग घेण्याचे कार्य सुरू केले.सन २०१६/१७ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तसेच जिल्हा परिषद जळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड करून मला सन्मानित केले.त्यानंतर जिल्हाभरात शेकडो ठिकाणी माझा विविध संस्था संघटना व मित्र परिवाराच्या वतीने गौरव झाला.माझ्या गावाने एकत्रित येऊन माझी घोड्यावरुन वाजत-गाजत मिरवणूक काढली यामुळे मिरवणुकीत तत्कालीन खासदार तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे,पंचायत समितीच्या सभापती स्मितलताई बोरसे व सर्व सदस्य,अधिकारी तहसीलदार शिक्षण विभागाचे अधिकारी गावाचे सर्व आजी माजी सरपंच हजारो युवक ग्रामस्थ एकत्रित येऊन सहभागी होते. गावाने माझा त्यावेळी कुंझर भूषण सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक सन्मानाने बहाल करून गौरव केला. एक प्रकारे हा देशातील सर्व शिक्षकांचा पहिल्यांदा झालेला प्रतिनिधी गौरव होता. यावेळी शिक्षकाच्या बांधिलकीतून सर्वांना एकत्र राहण्याची शांतता अवयवदान बेटी बचाव बेटी पढाव तसेच शाश्वत विकासाची मी आवर्जून शपथ दिली.यशाची दोरी शिक्षकाच्या हाती असल्याने व एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची मिळालेली शक्ती व विद्यार्थ्यांना मार्फत मिळणारा आनंद बघून मला सार्वजनिक जीवनात आयुष्याचे गणित जुळताना प्रामाणिक दृष्टिकोनातून केलेल्या सर्व सहकार्यामुळे विविध पक्षांच्या वतीने अनेकदा प्रवक्ते पदाच्या व इतर कार्याच्या संधी आल्यात. परंतु शैक्षणिक समाजसेवा हा माझा आवडीचा विषय असून निवडणुका राजकारण हा विषय माझा आवडीचा प्राधान्याचा अजिबात नाही, राज्यातील जिल्ह्यातील सर्व भागाची भौगोलिक सामाजिक स्थितीचा माझा बारकाईने अभ्यास जरूर आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून मास्टर ऑफ जर्नालिझम ची पदव्युत्तर पदवी संपादन केल्याने मला राजकीय शैक्षणिक पत्रकारिता साहित्यिक आणि विकास क्षेत्रात सातत्याने चिकित्सक अभ्यास करण्याची  मूलभूत आवड आहे.

मी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहे हे मी कधीही विसरलो नाही. राजकारणात मला अजिबात रस नसून या क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळालेल्या निमंत्रण यांच्या संधीकडे त्या माझ्यापर्यंत पोचविणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ राज्यस्तरीय महानुभाव हितचिंतक मान्यवरांची मान्यवरांची  मी नम्रतेने माफी मागितली आणि शिक्षकी पेशा समरसतेने पुढे सुरू ठेवला आहे.साहित्य शिक्षण सहकार पत्रकारिता सर्व क्षेत्रात समान पातळीवर अनेक मित्र मला मिळाले. कार्य करीत असताना बरेचदा अनेक अडचणी आल्या परंतु हेतू प्रामाणिक असल्यामुळे माझी वाटचाल उद्दिष्टाकडे सुरू शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करण्याचा योग येत आहे सतत मंत्रालयात जाऊन मी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहे.अज्ञान तेचा अंधकार मिटवूनी ज्ञानाची ज्योत पेटविली संस्काराचे बीज रोवूनी आदर्श विचारांची शिकवण दिली. असे आमचे स्वर्गीय वडील आदर्श शिक्षक तात्यासाहेब रमेश सहादु पाटील हे माझे इयत्ता पहिलीपासून चे गुरु शिक्षक होते. त्यांच्या सहवासात माझी जडणघडण झाली आणि या जडणघडणीत मला समाजव्यवस्थेत निस्वार्थपणे काम करण्याचे धडे मिळाले.जिल्ह्यातील शिक्षकांसाठी असलेल्या पतपेढी आहे तसेच ग.स. सोसायटी मध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये भविष्यकाळात सहभागी होणे किंवा काय यासंदर्भात मला अजिबात रस नसून केवळ शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन शाश्वत काम करणे व गाव विकासाची एकत्रित समन्वयातून शाश्वत चळवळ जिल्ह्यात तयार करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. एक वही एक पेन एक विद्यार्थी एक शिक्षक अनेक ठिकाणी प्रज्वलित झाले तर शासनाच्या जनकल्याणाच्या योजना तळागाळात अधिक प्रभावीपणे पोहोचतील यात अजिबात शंका नाही.लोक कल्याणकारी योजनांची लोकचळवळ निर्माण होण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.शिक्षक दिनानिमित्त मी एवढेच सांगू इच्छितो की, समाजातील सर्व घटकांनी आपापल्या गावातील परिसरातील ओळखीतील शाळेला जीव लावा. आपल्या गावातील सर्व शिक्षकांना मनापासून जीव लावा. आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.


आपलाच किशोर पाटील कुंझरकर – राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जळगाव जिल्हा. राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ.राज्य महासचिव,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ-राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समिती महाराष्ट्र राज्य.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बदलता भारत- फिरोज शेख

Next Post

न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

Next Post
न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications