<
जळगाव(प्रतिनिधी)- आयर्न लेडी म्हणून गौरविलेल्या गेलेल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना गोदावरी फाऊंडेशनतर्फे अभिवादन करण्यात आले.गोदावरी फाऊंडेशन संचलित, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नरेंद्र नेमाडे यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती देत आठवणींना उजाळा दिला. देशाच्या इतिहासात प्रथमच महिला पंतप्रधान म्हणून कणखर नेतृत्व इंदिरा गांधी यांच्या रुपाने लाभल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
यावेळी भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, प्रशासकीय अधिकारी अनंत इंगळे, नरेंद्र नेमाडे, सुजित ढाके, गौरी जोशी, दीक्षा मोरे, कल्याणी कुळकर्णी, राजू राणे, सागर पाटील, मिलिंद पाटील, अमोल बोंडे, मिलिंद सरोदे, तुषार फेगडे, दीपक पाटील, रितेश बोरोले आदि उपस्थित होते.