<
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- येथील महेंद्र पाटील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन नागपूर या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवड त्यांनी आजतगायत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष चेतन कासव यांनी निवडपत्र देऊन केली. सदर निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.