<
जळगांव( धर्मेश पालवे):-विविध प्रसार माध्यमात आपण नेहमी वाचत असतो की सोशल मिडियाच्या सहाय्याने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बँक, ए टी एम, पे- अँप,आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरत असणाऱ्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक होत असते.आज असाच काही प्रकार जिल्ह्यात पुन्हा घडला असल्याचं समोर आले आहे. विक्रांत काटकर व लखन घारू या तरुणांना आज सकाळी ठीक १०वाजून ३५ मि.वाजता ९३३००६९५४६ या नंबर वाटून कॉल आला, मी बांद्रा मुंबई एस.बी.आय बँकेच्या हेड हॉफिस मधून बोलत असून तुमचे बँकेचे ए टि एम कार्ड वैधता संपली असून ते बंद होणार असल्याने पुन्हा कार्ड हवे असल्यास आताच पासवर्ड सांगा असे सांगण्यात आले.
मात्र, सदर तरुण हे सुशिक्षित असल्या कारणाने माहिती दिली गेली नाही,सजग होऊन तरुणांनी त्या फसव्या व्यक्तीला प्रश्नात गुंतवत त्याचा कॉल रेकॉर्ड केला व सरड सायबर पोलीस कार्यालयात संपर्क साधला, तक्रार दिली असता त्या ठिकाणी सुद्धा अश्याच फसवणुकी संदर्भात आधीच एका व्यक्ती ची चौकशी सुरु होती.या वरून असे प्रकार जास्त प्रमाणात घडू शकतात, नागरिकांनी चौकस राहावे, कोणत्याही कॉल ची खात्री होण्यापूर्वी आपल्या गुपित माहितीचा उलगडा करू नका. असे पोलीस प्रशासनाने सांगितले. तर तरुणांनी नागरिकांना माहिती व्हावी म्हणून सत्यमेव जयतेच्या प्रतिनीधीस संपर्क साधत माहिती दिली.