Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोव्याच्या सालगावकर फुटबॉल क्लबतर्फेजळगावच्या उत्कर्ष देशमुखला खेळण्याची संधी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 23 (क्रीडा प्रतिनिधी) – जळगाव येथील जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी सुभाष देशमुख यांचा मुलगा उत्कर्ष याला गोव्याच्या साळगावकर फुटबॉल क्लबतर्फे संतोष ट्रॉफी सिनियरसाठी खेळण्याची संधी प्राप्त झाली झाली आहे. या स्पर्धेच्या निवडचाचणीसाठी 300 हून अधिक खेळाडू होते त्यात उत्कर्षने दाखविलेली चुणूक व कौशल्यामुळे उत्कर्षने पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याची निवड झाली हे विशेष. 29 नोव्हेंबर रोजी राजस्थान जयपूर येथे जाण्यासाठी संघ रवाना होत आहे. 3 व 5 डिसेंबर2021 ला संतोष सिनियर ट्रॉफीचे सामने रंगणार आहेत. 

उत्कर्षची सुरूवात जैन स्पोर्टस् अकॅडमीतून झालेली आहे. त्याच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले. उत्कर्षला लहानपणापासून फुटबॉल खेळ व इतर खेळांबद्दल नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यादृष्टीने त्याने फूटबॉलचा खूप सराव केला. जळगाव येथील फुटबॉल कोच धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार तो खेळला आणि खेळात वेगळा असा ठसा उमटवू शकला. ट्रॉफी आणि पदकांनी त्याचा गौरव झाला. 

गोव्याचा साळगावकर फुटबॉल क्लब फुटबॉल क्षेत्रात लौकीक मिळविलेला क्लब आहे. त्यात त्याला खेळण्याची, चमकदार कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. त्याने फूटबॉल आपल्या पुरता मर्यादीत न ठेवता अनेक तरुणांना या खेळाचे प्रोत्साहन दिले व करियर म्हणून देखील या फुटबॉल खेळाकडे बघ्याच्या दृष्टीकोन युवा खेळाडूंना दिला.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

Next Post

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo