<
चोपडा-(प्रतिनिधी) -राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. याकामात महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर विविध पुरस्कार घेत देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागातुन राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत वासो संस्थेकडून प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीत गट संसाधन केंद्र(पाणी व स्वच्छता) स्थापन करण्यात आले असुन यात कार्यरत काम करणारे कंञाटी गट समन्वयक, समुह समन्वयक कार्यरत आहेत.परंतु यांना अतिशय कमी आठ हजार रूपये मानधन देण्यात येत आहे गेल्या सात वर्षात स्वच्छतेच्या, जाणीवजागृती,सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम,सार्वजनिक पिण्याचे पाणीगुणवत्ता स्रोतांचे मुल्यमापन, शौचालय वापराबाबत जनजागृती, स्वच्छता दर्पण असे विविध कार्यक्रम हे कर्मचारी यशस्वीपणे राबवत असतांना देखील केद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत हे कंञाटी कर्मचारींची दखल शासनाकडुन घेण्यात आली नाही यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीत कार्यरत कंञाटी कर्मचारीं शासनाचे लक्ष वेधत आपल्या समस्या सोडवण्यासाठी ४ सप्टेंबर पासुन संपाचे हत्यार उपसले आहे.
गट समन्वयक व समुह समन्वयक यांना अनेक जिल्ह्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात चार पाच महिन्यापासुन मानधन मिळत नाही तर काही ठिकाणी अकरा महिन्यांची आॕर्डर संपुन देखील नवीन आॕर्डर मिळालेल्या नाहीत यामुळे अल्प मानधनात काम करत असतांना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर फिरण्यासाठी यांना काही अपघात झाला तर कुठलाही अपघाती विमा किंवा उपचारासाठी आरोग्य विमा लागु नाही यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.इतर शासनामार्फत सुरू असलेल्या योजनातील कंञाटी कर्मचारींना मानधन प्रमाणे मानधन मिळावे यासाठी शासनस्तरावर आजवर कुठलाही मानधन बाबत निर्णय होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र ( पाणी व स्वच्छता )कंञाटी कर्मचारी संघटना मार्फत पंचायत समितीत काम करणारे कंञाटी कर्मचारी दिनांक ४ सप्टेंबर पासुन राज्यभरातुन केंद्र शासनाच्या सुचनानुसार मानधन वाढ मिळावी , वेळेवर मानधन व्हावे, अपघाती व आरोग्य विमा लागु करावा,सेवेत कायम करावे अशा विविध मागण्या घेऊन राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
वरील मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) श्री लोखंडे साहेब यांना महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र ( पाणी व स्वच्छता )कंञाटी कर्मचारी संघटना जळगाव च्या वतीने देण्यात आले.