Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- मा. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत 16 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 15 हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. याच धर्तीवर आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत करण्यात येईल.

प्रभागसभेत सध्या अस्तित्वातील मतदार यादी प्रभागातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रभागातील सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद तपासून दावे व हरकती सादर करता येतील. तसेच प्रभागातील मृत, स्थलांतरीत, दुबार, लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिला मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येईल.

दिव्यांग तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येणार आहेत. शहरी भागातील मतदारांनी प्रभागनिहाय यादी वाचनात सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गोव्याच्या सालगावकर फुटबॉल क्लबतर्फेजळगावच्या उत्कर्ष देशमुखला खेळण्याची संधी

Next Post

बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी

Next Post
बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी

बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d