<
जळगांव(धर्मेश पालवे):-येथील मनपा समांतर रस्ते, हुडको कर्ज, गाळेधारकांचे प्रश्न, शहरतील रस्ते ,खड्डे, आणि आरोग्य सेवे सह नुकत्याच घरकुल घोटाळा प्रकारणातील लागलेल्या निकाला मुळे जळगांव जिल्हा मनपा च्या भोंगळ कारभाराची जिल्ह्यात व महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा झाली आहे. शासन, मनपा प्रशासन,लोकप्रतिनिधी, जनसेवक,आदींना समज यावा असा इतिहास घडूनही जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वछता, आरोग्य,व सूरक्षा यावर प्रश्न उपस्तीत होत आहे.
गेल्या महिन्यात पावसाचे थैमान होते,धूळ, धुके व पाऊस हे सर्व लोकांनी अनुभवले आहे हा मुबलक पाणी असल्याने घाणीचे व दुर्गंधी चे वातावरण सर्वत्र होते,आता हाच कचरा संकलन ठिकाणी ओला व कोरडा कचरा स्वरूपात पडून राहतो, तर काही ठिकाणी रस्त्याच्या खड्डे व सुशोभीकरण सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीस अडचणी होत आहे . प्रशासनाकडून याकरिता काहीच उपाययोजना होत नाही. तर काही ठिकाणी शहरी दुभाजकावर लावलेले नवीन विद्युत खाम्ब हे वाकले असून सुरक्षेच्या कोणत्याही एका निकशानुसार हे, काम झाले नाही या विषयी प्रसिद्धी ही झाली आहे. मनपाची ही भविष्यात धोकेदायक परिस्तिथी असल्याचं चित्र आहे, त्याच बरोबर दुभाजकावर मोठ्या प्रमाणात गवत वाढून त्यात मच्छरांचा प्रादुर्भाव होत असून रस्त्यालगत असणाऱ्या रहदारीस त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यात वाहतुकीला आडकाठी ठरणारे मोकाट जनावरे ,मोकळी गस्त घालणारी कुत्री तर नित्याचीच बाब आहे.
मात्र याकडे मनपा कडून उपाय योजना होत नसून नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व वाहतुकीच्या रहदारीस आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे ,व मनपा याकडे लक्ष देईल काय असा प्रश्न ही नागरिकांकडून उपस्तीत होत आहे. शहरातील या निवडक बाबींवर लक्ष देऊन जनकल्याणकारी मनपा ने आपली पावले उचलावी असेही नागरिकांकडून बोलले जात आहे.