<
भडगाव(प्रतिनिधी)- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडियम व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रमांतर्गत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांंना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांंच्या मनावर कोरली जावीत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी.डी.पाटील यांनी व्यक्त केले. संविधानाचे प्रकट वाचन करण्यात आले. निबंध, वक्तृत्व, पोस्टर, घोषवाक्य स्पर्धा विदयालयात घेण्यात आल्या. कलाशिक्षक वाय.ए.पाटील यांनी संविधानाचे महत्व विषद केले. भुषण कुमार अहिरे, सुमित राजपुत, सृष्टी पाटील, योगेश पाटील, गायत्री बोरसे, ऋतुजा न्हावी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
अकरावीच्या विद्यार्थीनी वैष्णवी पाटील, रेश्मा पाटील, गायत्री पाटील यांनी बोधपर पोस्टर तयार केली. विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.पाटील, मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील, शालेय समिती प्रमुख एस.जे.पाटील सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सुत्रसंचालन राकेश पाटील आभार एम.एस.देसले, नियोजन संस्कृतिक समितेने यांनी केले.