<
जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील आव्हाने शिवारातील श्री समर्थ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज शिक्षक दिनानिमित्त श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात केक कापून शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना व त्यांच्या पालकांना अध्यापन करण्याचा मान देण्यात आला होता. स्वतःच्या घरी एका मुलाला सांभाळताना किती त्रास होतो आणि तूम्ही शिक्षक वर्गात इतके विद्यार्थी कसे सांभाळतात. एवढ्या मुलांना सांभाळणे म्हणजे तुम्ही जणू काही तारेवरची कसरत करतात, असे पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तसेच या कार्यक्रमास विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील,मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता संस्था अध्यक्षांनी शिक्षकांना आणी पालक शिक्षकांना छोटीशी भेटवस्तू देऊन केली. कार्यक्रमाचे नियोजन मोहिनी सुरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री पाटील तर आभार चैताली पाटील यांनी मानले.