<
जळगांव(प्रतिनिधी)- चिमुकल्यांच्या शाळा पूर्णतः बंद असून ऑनलाईन पद्धतीने चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु आज पासून शासनाने सांगितल्याप्रमाणे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची घंटा आज केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय येथे वाजली.
चला अगोदर आपले तापमान व ऑक्सिजन चेक करा… अशा सूचना देत गुरुजींनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, फुगे देऊन तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले.
मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे अवलोकन करून दिले इयत्ता पहिली चौथीचे विद्यार्थी दोन गटांमध्ये विभागून आळीपाळीने शाळेत बोलावले जाणार आहे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन केले जाणार आहे.
प्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, दिपाली चौधरी, अशोक चौधरी, स्वाती पाटील, धनश्री फालक, कल्पना तायडे, सूर्यकांत पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.