अमळनेर(प्रतिनिधी)- येथील पोलिस स्टेशन मार्फत नियुक्त केलेले ‘दामिनी’ पथक शाळांना भेट देत आहेत. या पथकाला पाचारण करण्याचा उद्देश म्हणजे शहरातील शाळा आणि काॅलेज परिसरात टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करणं, वाईट प्रकाराला आळा घालणे आणि विद्यार्थिनींना संरक्षण प्रधान करणे.
त्या निमित्ताने आज श्री नारायणदास तेजकरण मुंदडा माध्य व उच्च माध्य विद्यालयात या पथकाने भेट दिली आणि या पथकातील महिला पो.काॅ. ईशी, पो.काॅ. जरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्यध्यापक नरेंद्र पुरुषोत्तम पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन दामिनी पथकाचा सत्कार केला. प्रसंगी विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.