Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : कोव्हिड – 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online Web Portal विकसित केले असुन, त्याव्दारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वेबसाईट वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm ही देखील लिंक देण्यात आली आहे.


अर्जदारास, त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशिल जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशिल (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड -19 मुळे मृत्युची नोंद झालेली आहे. अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्राची मागणी न करता मंजुर करण्यात येईल. इतर प्रकरणी कोव्हिड-19 मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate Cause of Death) असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजुर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड – 19 मुळे मृत्यु झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावी लागतील जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तर/ महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व यासमितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.


अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहील सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरीता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

Next Post

युवा मल्हार सेना व धनगर समाजातर्फे टॅक्सी चालकांचा सत्कार

Next Post

युवा मल्हार सेना व धनगर समाजातर्फे टॅक्सी चालकांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d