<
अमळनेर : तालुक्यातील जैतपिर परिसरातील रेल्वेगेट जवळील एका टॉवर ची बॅटरी व डिझेलची चोरी झाल्याची घटना ९ रोजी पहाटे घडली.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील जैतपिर येथील बेटावद रस्त्यावरील रेल्वे गेट जवळील रिलायन्स टॉवर च्या जनरेटरचा पत्रा वाकवून अज्ञात चोरट्याने १५ हजार ८३५ रुपयांचे बॅटरी व डिझेल चोरून नेले. ९ रोजी पहाटे रिलायन्स चा टॉवर बंद पडल्याने तंत्रज्ञ नाना विश्वासराव पाटील घटनास्थळी गेल्याने एक बॅटरी व ९५ लिटर डिझेल चोरीस गेल्याचे उघडकीस आले.
सुपरवायझर दादाभाऊ सुरेश खलाणे यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरत्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए एस आय किशोर पाटील पुढील तपास करीत आहेत.