<
भडगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे मुख्या. प्राचार्य डी. डी. पाटील यांना महाराष्ट्र भुषण शिक्षक प्रेरणा पुरस्काराने गौरव करून मराठा विद्याप्रसारक सभागृह नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार, स्वागत अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार रोहित पवार, आमदार किशोर दराडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, मा. सभापती नगरसेविका योजना पाटील, अध्यक्ष तुषार रंधे, संचालक अतुल निकम आदि मान्यवरांच्या हस्ते संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्याध्यक्ष डी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, महासचिव संतोषराव पाटील सह निसर्ग समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
डी. डी. पाटील यांचे शिक्षण क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रातील योगदान कार्याची दखल घेत महाराष्ट्र भुषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार सन्मान गौरव निमित्त संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.