<
समिधा व्याख्यानमालेचा जळगावात शुभारंभ
जळगांव(प्रतिनिधी)- समिधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दिव्या यशवंत भोसले यांच्या तर्फे पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पाच दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन आज सकाळ माध्यम समूहाचे संपादक संदीप काळेंच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या दिवशी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी पहिले पुष्प गुंफले. राजश्री पाटील यांनी जिजाऊ -सावित्री ते आजची स्त्री प्रगती आणि अधोगती… या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिजाऊंची महती सांगून राजश्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात केली. त्यानंतर विविध प्रकारे महिलांच्या सक्षमीकरणाचे धडे तसेच महिला प्रबोधम यावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात महिलांनी सक्षम रित्या व्यवसायात कसे उतरावे आणि पुढील आव्हाने यावर सखोल विचार मांडले.महिलांचे आरोग्य चांगले असेल तर घर आणि व्यवसाय दोघं सक्षम सांभाळू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी महिलांनी आधी घेतली पाहिजे.
अशाप्रकारे राजश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपला भारत देश येणाऱ्या २०२२ ह्या वर्षात वयाचा अमृत महोत्सव(INDIA@75) साजरा करेल. ह्याच अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘समिधा प्रतिष्ठान’ येत्या वर्षभरात समाजउपयोगी काही उपक्रम राबवून, आपल्या ब्रीदवाक्या प्रमाने कर्मयोग यज्ञाची सुरवात करीत आज समिधा व्याख्यानमालेत राजश्री पाटील व संदीप काळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभर स्त्रियांसाठी वैद्यकीय शिबिरे व समुपदेशन केंद्रे या उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात,करून समिधा प्रतिष्ठान च्या कर्मयोग यज्ञाचे उदघाटन करण्यात आले.
पुढील 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे विचार ऐकण्याची मेजवानी प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा दिव्या यशवंत भोसले यांनी त्यांच्या समिधा मार्फत उपलब्ध करून दिली आहे. यावेळी प्रास्ताविक नेहा पवार यांनी केले तर समिधा प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा दिव्या यशवंत भोसले यांनी आभार मानले.