<
जळगांव(धर्मेश पालवे):- जिल्ह्यातील रस्त्याच्या बाबतीत नेहमी काही ना काही वाचायला मिळते, यावरील अपघात तर नित्याचेच आहेत.आज रोजी सकाळी ठीक १०वाजून १५मी च्या वेळेस स्वातंत्र्य चौक येथील डोमिनोज पीझा च्या समोर वाहन येत असताना धुळे – जळगांव बस च्या मागच्या बाजूस कट लागल्याने व एसटी अचानक थाबल्याने MH -१९ AC-३११० या क्रमांकाच्या स्कुटी ला अपघात झाला.
यात स्कुटीचा पुढचा भाग पूर्णतः चुरा झाला असून प्रसंगावधान राखत स्कुटी चालकाने उडी घेतली, आणि होणारे संभाव्य धोका टाळता आला, मात्र एसटी चालकाच्या चुकीने झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा ही काही वेळा झाला, वेळीच पोलीस हजर झाले असता रस्ता वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि एसटी चालकांवर संबंधित अपघातासाठी पोलीस चौकशी करीत आहेत.