<
जळगांव(प्रतिनिधी)- संपूर्ण भारताचे आराध्य दैवत विश्ववंदनिय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सदाशिव नगर, बंगळूर येथील पुतळ्याची काही समाजकंटकांनी घोर विटंबना केलेली आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद, निंदनीय व संतापजनक आहे. या गंभीर घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्मई यांनी कुठलीही कारवाई न करता समाजकंटकांना पाठीशी घातले व शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले.
या सर्व प्रकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवार रोजी शिवतीर्थ, जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाण्याने धुण्यात आले व त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीला दूध, दही, लोणी, तूप, सहद आदि पंचामृताने अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे.
आमच्या अस्मितेचा कुणी अपमान करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कुणीही असे निंदनीय काम करण्याची हिंमत करणार नाही. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी यापुढे असे बेताल वक्तव्य करू नये. असे मत यावेळी माजी मंत्री तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन श्री. गुलाबराव देवकर यांनी पत्रकारांशी बोलतांना मांडले व पत्रकारांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे उपरोक्त मागणी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध असो, भाजपा चा जाहीर निषेध असो अश्या घोषणा देऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर आंदोलनात माजी मंत्री तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबरावजी देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस ऐजाजभाई मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटिल, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला आघाडी महानगराध्यक्षा मंगला पाटील, दिलीप माहेश्वरी, विनोद देशमुख, मजहरभाई पठाण, सुनिल माळी, अमोल कोल्हे, वाय. एस. महाजन, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, राजू मोरे, रमेश बाऱ्हे, अशोक सोनवणे, जितेंद्र चांगरे, राहुल टोके, सचिन पाटील, मुविकोरोज कोल्हे, पंकज वाघ, यशवंत पाटिल यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.