<
जळगाव -(दिपक सपकाळे)- येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक संचलित प्राथामिक शाळा यांच्या कडून प्रथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेला प्रथम अपील निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
सविस्तर असे कि जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक दिपक सपकाळे यांनी जुलै महिन्यात अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित प्रथमिक शाळा खाज मिया चौक, जळगाव यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्यान्वये अर्ज करून शाळेच्या प्रशासकीय बाबींची व विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती मागितली होती. परंतु ३० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर देखील कोणतीच माहिती न दिल्याने अर्जदार यांनी मा.श्री.डॉ.देवांग साहेब प्रथमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ कलम-१९-(1) प्रथम अपील अर्ज दाखल केला होता.
त्यावर प्रथम अपिलीय अधिकारी तथा प्रथमिक शिक्षणाधिकारी श्री.डॉ. देवांग साहेब यांनी दिनांक २०/०८/२०१९ रोजी ठीक दुपारी ३ वाजता त्यांचा दालनात प्रथम अपील सुनावणी घेण्यात आली होती. मात्र या सुनावणीस सदर शाळेचे मुख्याध्यापक गैरहजर होते. तसेच अपिलाच्या सुनावणी वेळी प्रथम अपील अधिकारी यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अपील निर्णय मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत अर्जदारास विनामूल्य रजिस्टर पोस्टाने माहिती देण्याचा निर्णय देण्यात आला आहे .
सदर निर्णय होऊन आज रोजी १५ दिवस पूर्ण झाले आहेत तरी देखील संबंधित शाळेने कोणतीच माहिती अर्जदार यांना उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे प्रथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. डॉ. देवांग यांनी पारित केलेला निर्णय संबंधितांनी केराची टोपली समजून धूळखात ठेवलेला असल्याचे दिसून येत आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याने शिक्षणाधिकारी काही कारवाई करतात का याकडे लक्ष लागून आहे. अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित मराठी शाळा माहिती अधिकारात माहिती देत नसल्याने या शाळेत नक्कीच मोठा भ्रष्टाचार असल्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. जो पर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत नेमका काय भ्रष्टाचार आहे हे समजणे कठीण आहे.
माहिती न मिळाल्यामुळे अर्जदार राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करणार आहेत.