<
रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
निंभोरा बु।।ता रावेर(वार्ताहर)येथे रेल्वे च्या स्थापना पासून अमृतसर दादर पठानकोट एक्सप्रेस याचा थांबा होता परंतु कोरोना च्या काळात बंद होता. एक्सप्रेस सुरु होऊन रावेर तालुक्यातील सावदा आणि रावेर येथे थांबा सुरु झाला आहे परंतु निंभोरा रेल्वे स्टेशन येथे पठानकोट एक्सप्रेस चा थांबा बंद आहे तो नेहमी प्रमाणे सुरु करावा अशी मागणी त्याच प्रमाणे भुसावळ येथे रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण घरे घोषित करून ते पाळण्यात आले आहे.
सरकारचे धोरण आहे की प्रत्येकाला हक्काचे घरे मिळावे ,विस्थापितांना पर्यायी जागा द्यावी या दृष्टीने भुसावळ येथील रेल्वे परिसरातील झोपडी धारकांना राहण्याचे घरे मिळावे अशी मागणी व निवेदन दिल्ली येथे जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास वामन अवसरमोल तसेच रावेर तालुका उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड़ यांनी रेल्वे राज्य मंत्री श्री. राव साहेब दानवे यांच्या कड़े मागणी केली आहे .यावेळी मंत्री दानवे यांनी दोघ मागण्या चे लवकरच मार्गी लावू असे सांगितले असे अवसरमोल यांनी सांगितले.