<
जळगाव- सावधान..! जर तुम्ही शहरातील हात गाड्यांवर तळलेल चिकन खात असाल तर तुमचं व तुमच्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात आहे. जुने बीजे मार्केटसमोर तसेच रेडक्रॉस रक्तपेढीच्या बाजूला हात गाड्यांवर तळलेल चिकन विक्री केले जाते. येथून एका ग्राहकाने आज दि.१० रोजी ९:३० वाजता तळलेले चिकन विकत घेतले असता त्यात सडलेलं चिकण आढळून आले व त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. यामुळे शहरात हात गाड्यांवर विकले जाणारे चिकन हे लोकांच्या आरोग्यासाठी घातक असून अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी संबंधित सुज्ञ ग्राहकांकडून केली जात आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन या हात गाड्यांवरील विकलं जाणार चिकन खाण्या योग्य आहे का? नाही याची खातरजमा करेल का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अशुध्द व एकाच तेलात वारंवार तळले जाणारे चिकन व अन्य पदार्थ यामुळे गंभीर आजार होऊ शकतो असे तज्ञांचें म्हणणे आहे.
F. D. A नी याकडे लक्ष दिले पाहीजे