Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड बाधितांनी मदतीसाठी विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा;बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2022
in राज्य
Reading Time: 3 mins read
कोविड बाधितांनी मदतीसाठी विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा;बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमधील नियंत्रण कक्षांसह मुख्यालयातील ‘मुख्य नियंत्रण कक्ष’ अव्याहतपणे कार्यरत

कोविड बाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह ‘कोविड-१९’ संबंधी विविध अडचणींबाबत नागरिकांना थेटपणे मार्गदर्शन मिळावे; या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून २०२० पासून अंमलात आणली असून ती आजतागायत अव्याहतपणे कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर ‘वॉर्ड वॉर रूम्स’ म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांना ‘कोविड-१९’ बाबत मदत व मार्गदर्शन हवे असेल, तर वॉर्ड वॉर रूमकडे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्ण शय्या मिळवून देणे तसेच गृहविलगीकरणात बाधित असलेल्या रुग्णांना योग्य स्वरूपाचे समुपदेशन करण्यासाठी आता ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी ‘वॉर्ड वॉर रूम‘ महत्वाची कामगिरी बजावत आहेत. जून २०२० पासून विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरु आहे. यातून कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होत आहे.

या ‘वॉर्ड वॉर रूम‘ अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

  • ‘ए‘ विभाग ०२२ – २२७०-०००७
  • ‘बी‘ विभाग  ०२२ – २३७५-९०२३, २३७५-९०२५
  • ‘सी‘ विभाग ०२२ – २२१९-७३३१
  • ‘डी‘ विभाग ०२२ – २३८३-५००४, ८८७९-७१३-१३५
  • ‘ई‘ विभाग ०२२ – २३७९-७९०१,
  • ‘एफ दक्षिण‘ विभाग ०२२ – २४१७-७५०७, ८६५७-७९२-८०९
  • ‘एफ उत्तर‘ विभाग ०२२ – २४०१-१३८०, ८८७९-१५०-४४७, ८८७९-१४८-२०३
  • ‘जी दक्षिण‘ विभाग ०२२ – २४२१-९५१५, ७२०८-७६४-३६०
  • ‘जी उत्तर‘ ०२२ – २४२१-०४४१, ८२९१-१६३-७३९
  • ‘एच पूर्व‘ विभाग ०२२ – २६६३-५४००
  • ‘एच पश्चिम‘ विभाग ०२२ – २६४४-०१२१,
  • ‘के पूर्व‘ विभाग ०२२ – २६८४-७०००, ८६५७-९३३-६८१
  • ‘के पश्चिम‘ ०२२ – २६२०८३८८
  • ‘पी दक्षिण‘ विभाग ०२२ – २८७८-०००८, ८८२८-४७६-०९८, ७३०४-७७६-०९८
  • ‘पी उत्तर‘ विभाग ०२२ – ६९६०००००,
  • ‘आर दक्षिण‘ ०२२ – २८०५-४७८८, ८८२८-४९५-७४०
  • ‘आर उत्तर‘ विभाग ०२२- २८९४-७३५०, ८३६९-३२४-८१०
  • ‘आर मध्य‘ विभाग ०२२ – २८९४-७३६०, ९९२०-०८९-०९७
  • ‘एल‘ विभाग ०२२ – २६५०-९९०१, ७६७८-०६१-२७४,
  • ‘एम पूर्व‘ विभाग ०२२ – २५५२-६३०१, ७२०८-६८०-५३८
  • ‘एम पश्चिम‘ ०२२ – २५२८-४०००,
  • ‘एन‘ विभाग ०२२ – २१०१-०२०१,
  • ‘एस‘ विभाग ०२२ – २५९५-४०००, ९००४-८६९-७२४
  • ‘टी‘ विभाग ०२२ – २५६९-४०००.

(विशेष सूचना : वर उल्लेखित ‘लँडलाईन‘ दूरध्वनी क्रमांकांवर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधावयाचा झाल्यासच क्रमांकापूर्वी ‘०२२‘ हे आकडे जोडणे आवश्यक ‌आहे)

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या “दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस” अर्थात ‘२४x७‘ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रुममुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा आणि समुपदेशन दिले जात आहे. गरजू कोरोना बाधितांना तात्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी ‘अधिक लवकर व जलद‘ झाला आहे.

यासोबत गृह विलगीकरणात असलेल्या कोविड बाधितांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची अद्ययावत माहिती घेणे, नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे, स्थानिक पातळीवर कामकाजात योग्य समन्वय साधणे ह्यातून वॉर्ड वॉर रूम यंत्रणेने मध्यवर्ती यंत्रणेवरील ताण हलका तर केलाच पण मुख्य म्हणजे कोविड बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांनी योग्य त्या मदतीसाठी आपापल्या विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम‘ कडे संपर्क साधावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.    

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

५०० रुपयांच्या आतील बेस्ट रिचार्ज प्लॅन, ८४ दिवसांची वैधता आणि खूपच काही…

Next Post

नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

Next Post
नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications