<
फैजपुरची भूमी ऐतिहासिक असून युवा पिढीला उच्च शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासोबतच करियर कट्टाच्या माध्यमातून तरुणांना करियरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालय सर्व सोयीं सुविधानी सुसज्ज व तत्पर आहे. यासोबतच व्यवस्थापन, प्रशासन व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून येणारा काळ येथील तरुणांसाठी सुवर्ण काळ असेल असे मत मा श्री यशवंत शितोळे, अध्यक्ष एमकेसीएल यांनी व्यक्त केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टाच्या माध्यमातून आढावा भेटीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय समन्वयक प्रा डॉ सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे, करियर कट्टा महाविद्यालय समन्वयक प्रा डॉ एस व्ही जाधव, डॉ कल्पना पाटील, लेफ़्ट डॉ राजेन्द्र राजपूत, डॉ सागर धनगर, डॉ सरला तडवी, प्रा शेरसिंग पाडवी, महाविद्यालयाच्या करियर कट्टा एककाचे ब्रँड ॲम्बेसिडर जयमाला चौधरी व रोहित चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आय ए एस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, संविधाना चे पारायण अशा नाविन्यपूर्ण उपक्रमा सोबतच सर्वच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन ‘करियर कट्टा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या मार्फत केले जाते. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांच्या सोयीसुविधांच्या आढावा भेटी दरम्यान मा श्री यशवंत शितोळे व मा डॉ सचिन नांद्रे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाच्या करियर कट्टा एककाचे ब्रँड ॲम्बेसिडर रोहित माधव चौधरी (तृतीय वर्ष संगणक शास्त्र विभाग) व जयमाला दीपक चौधरी (एम एसस्सी सूक्ष्म जीव शास्त्र विभाग ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले.
या भेटीदरम्यान मान्यवरांनी 1936 च्या पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाचे स्मारक म्हणून प्रेरणा स्तंभ, स्किल सेंटर, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी यांच्यासोबत महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. यासाठी शेखर महाजन, चेतन इंगळे यांनी परिश्रम घेतले.